पुण्यात हिंदी बोलण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.

One major reason why there is still some Marathi heard in the larger cities (Mumbai, Thane, Pune, Nagpur, Nashik etc.) is because English was retained as a co-Official Language in India.

फक्त हिंदी ही जर अधिकृत भाषा राहिली असती, तर आत्तापर्यंत या शहरांत मराठी ऐकायला मिळणे दुर्मिळ झाले असते.

मराठीची (आणि अशा इतर भारतीय भाषांची) खरी स्पर्धक आणि मारक इंग्रजी नाही, धोका इंग्रजीकडून नाही, हिंदीकडून आहे. हे आपल्या तमिळ बांधवांनी कधीचेच ओळखले आणि त्यामुळे त्यांच्या राज्यात तामिळी भाषेला गौरवस्थान तर लाभलेचआणि शिवाय त्या लोकांनी इंग्रजी आत्मसात करून भौतिक प्रगतीही साधली.

आपले धोरण मात्र - (मराठी)माय मेली तरी चालेल, (हिन्दी)मावशी जगली पाहिजे!

ani maharashtra kahi rajyanpqiki ek hota jyani hyacha wirodh kela. 1964 mdhe apan jasta progressive hoto bahuda.

हिंदी मराठीची मारक हे खोटे वाटत असेल तर वरील u/jeerraaचे वाक्य वाचा. पंधरा वर्षांपूर्वीपर्यन्त मराठीमध्ये हेच वाक्य "ह्याला विरोध केला" असे लिहिले गेले असते. हल्ली "ह्याचा विरोध केला" असे लिहितात. का? कारण हिंदीमध्ये "इस का विरोध किया" असे म्हणतात, "इस को विरोध किया" असे म्हणत नाहीत.

याच चालीवर, पूर्वी मराठीमध्ये "मी त्याला मदत केली" असा वाक्प्रयोग होत असे, हल्ली "मी त्याची मदत केली" असे म्हणतात.

तर अशा या हिंदीच्या प्रभावामुळे मराठीतल्या षष्ठीची आपण षष्ठी घातली आहे.

त्याहूनही अधिक धोक्याची घंटा पाहायची असेल तर Airtelसारख्या कंपनीच्या कस्टमर केअरला फोन लावून मराठी भाषेचा पर्याय निवडा. तुम्हांला हटकून हिंदी executive assign केला जाईल. का? - कारण आपण मराठीचा आग्रह तर धरत नाहीच, वर पर्याय म्हणून हिन्दी स्वीकारतो (इंग्रजी किंवा कन्नड किंवा गुजराती किंवा तेलगू नव्हे.) मग कशाला दोनपाच ग्राहकांसाठी मराठी executive ठेवेल ती कंपनी call-centre मध्ये?

Bank call centres, phone companies, DTH, insurance agents, loan agents, post offices, - Take any of the "commercial" aspects of your life. It is highly likely that you do not insist on Marathi as the medium of communication, and moreover, accept Hindi (not English) as the alternative.

वरती u/NotBaldEagle_ यांनी मांडलेले तंत्र (प्रथम स्थानिकभाषा, समोरच्याला ती येत नसेल तर इंग्रजी) हे केवळ स्वभाषेचा वापर वाढवायला उपयुक्त नाही, तर आपले इंग्रजी संवादकौशल्य सुधारायलाही उपयुक्त ठरते. आणि शिवाय ओसरीमध्ये हळू हळू पाय पसरणार्‍या पाहुण्यालाही मर्यादेत राहाण्याची जाणीव करून देते.

अर्थात बापाला बाप न म्हणण्याचा जमान्यात भाषेविषयी आग्रह दूरच, अभिमान तरी कशाला बाळगावा? जसे आपले आई-बाप, देव, देश आणि धर्म आपण जन्माला येताना आपण निवडून घेतले नव्हते, तशीच ही भाषाही एक. सगळ्याच गोष्टींत लवचिकता आणि बदल स्वीकारणारे आपण, मग "जुने जाऊ द्या मरणालागुनी" असे म्हणत भाषेचे श्राद्ध घातले तर हरकत का असावी? /s

/r/pune Thread Parent